शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: सीतापूर , शनिवार, 26 जुलै 2014 (10:46 IST)

हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, सात ठार

उत्तर प्रदेशात हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर शुक्रवारी सायंकाळी कोसळले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर बरेलीवरून अलाहाबादला निघाले होते. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने पेट घेतला. यावेळी झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा होरपळून मृत्यू झाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटना स्थळी पोहोचले. परंतु, सात जणांचा मृत्यू झाला होता.