शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: राजकोट , सोमवार, 21 एप्रिल 2014 (17:29 IST)

'हिंदू बहुल भागातून मुस्लिमांना बाहेर काढा'

हिंदू बहुल भागात वास्तव्य करणार्‍या मुस्लिमांना बाहेर काढा, असे वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू विश्व परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. प्रवीण तोगडीयांनी गेल्या शनिवारी मेघानी सर्कलजवळ हे खळबळजनक वक्तव्य केले. विशेष म्हणजे मुस्लिम व्यावसायिकाला येत्या 48 तासांत घर खाली करण्‍यास सांगितले आहेत. घर खाली झाले नाही तर या घरावर दगड, टायर व टोमॅटो फेकावे, असेही तोगडीया यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील मेघानी सर्कलजवळ एक मुस्लिम व्यावसायिकाने घर खरेदी केले. या खरेदीला काही हिंदू नागरिकांनी विरोध केला आहे. या विरोधात तोगडीया मुस्लिम व्यावसायिकच्या घराबाहेर पोहोचले. याठिकाणी तोगडीया यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजरंग दलाचा फलक लावण्यास सांगितले. घर खरेदी करण्‍याचा व्यवहार रोखण्यासाठी डिस्टर्ब एरिया अॅक्ट लागू करण्‍यासाठी राज्य सरकारचा दबाव हवा. तर संबंधित घरावर जबरदस्तीने ताबा घ्यावा, यामुळे वर्षानुवर्षे न्यायालयीन लढाई सुरु राहिल.

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना अद्याप फाशी झालेली नाही. त्यामुळे घाबरण्‍याचे कारण नाही. न्यायालयात याचिका सुरु राहिल असेही तोगडिया यांनी सांगितले आहे.