शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 10 डिसेंबर 2015 (14:23 IST)

हिट अँड रन: सलमानची निर्दोष मुक्तता

मुंबई- बहुचर्चित हिट अँड रन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली. सबळ पुराव्यांअभावी सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली. निकालावेळी सलमान खान न्यायालयात उपस्थित होता.
 
सलमान खान गाडी चालवत होता आणि तो दारूही प्यायला होता हे पोलिस आणि अभियोग पक्ष निर्विवादपणे सिद्द करू शकले नाही. तसेच सत्र न्यायालयानेही पुरावे-साक्षी योग्य निकषांवर तपासले नाही, अशा पुराव्यांमुळे सलमान खानला दोषी ठरवता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
या प्रकरणात सलमान खान याचा मृत अंगरक्षक व साक्षीदार रवींद्र पाटील याची साक्ष ग्राह्य धरणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.  
 
सलमानवर 28 सप्टेंबर 2002 रोजी मद्यधुंद अवस्थेत पाच जणांना आपल्या आलिशान लॅंण्ड क्रूझर गाडीखाली चिरडल्याचा आरोप होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर चारजण जखमी झाले होते. याप्रकरणी 13 वर्षांपासून सलमानवर खटला सुरू होता. दरम्यान मे महिन्यात सत्र न्यायालयाने सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. सलमानने या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.