शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (12:31 IST)

हिट ऍण्ड रन: सलमनाला दिलासा, जामीन कायम राहणार

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. 
 
13 वर्षांपूर्वी झालेल्या ‘हिट ऍण्ड रन‘ प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेला सलमान खान याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रविंद्र पाटील यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती.
 
या प्रकरणात सलमानवर आरोप आहे की दारूच्या नशेत गाडी चालवताना झालेल्या या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला होता आणि तसेच चार जण जखमी झाले होते. 
 
मात्र, साक्षीदार बदलला गेल्यामुळे आणि सध्याच्या स्थितीत अशा प्रकाराची याचिका घेतली जाणार नसल्याचं सांगत न्यायालयाने ही फेटाळून लावली.