शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दौसा , शुक्रवार, 3 जुलै 2015 (10:12 IST)

हेमा मालिनींच्या कारने घेतला चिमुकलीचा बळी

राजस्थानमधील दौसा येथे खा. हेमा मालिनी जखमी यांच्या मोटारीने दुसर्‍या मोटारीस धडक दिल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून खा. मालिनी यांच्या कपाळासही जबर दुखापत झाली आहे.

आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे हेमामालिनी यांच्या मर्सिडीजने अल्टोला धडक दिली. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुदैर्वी अंत झाला. तर अल्टो कारमधील आणखी चौघे जण या अपघातात जखमी झाले. हेमा मालिनी यांनादेखील दुखापत झाली असून त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  पोलिसांनी हेमा मालिनी यांच्या गाडीचा चालक हेमंत ठाकूरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.