नवरात्राच्या उपवासात या प्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

fasting
Last Modified शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (12:44 IST)
नवरात्राला आरोग्याची नवरात्र असे ही म्हणतात. हा काळ हंगामाच्या बदलण्याचा असतो. अश्या परिस्थिती उपवास करताना काही सावधगिरी बाळगल्यानं निरोगी राहता येतं. चला जाणून घ्या अश्या काही कामाच्या गोष्टी.
1 उपवास : उपवास करण्याचा अर्थ आहे काहीच न खाणं. पण काही लोकं सकाळ संध्याकाळ साबुदाण्याची खिचडी, फळे, किंवा राजगिऱ्याच्या पोळ्या, आणि भेंड्याची भाजीवर ताव मारतात. अशामुळे आरोग्यास काय फायदा होणार. म्हणून उपवास योग्य अश्या पद्धतीने करावा. एकाच वेळेस जेवण करा.

2 व्रत पाळणे : बरेच लोकं नवरात्रात उपवास करतात. काही लोकं पूर्णपणे उपवास करतात तर काही लोकं एकाच वेळी जेवण घेतात. सतत नऊ दिवस उपवास केल्यानं शरीरातील टॉक्सिन्स म्हणजे विष बाहेर निघत. हे शरीरासाठी फायदेशीर असतं. उपवास केल्यानं शरीरातील कॉलेस्ट्रालचे प्रमाण कमी होतं, ज्या मुळे आपल्या शरीरासह आपले हृदय आणि इतर अवयवांची तंदुरुस्ती वाढते.
3 उत्तम आहार : या काळात काही लोकं फळाहार घेतात, तर काही लोकं खिचडी खाऊन नऊ दिवस उपवास करतात. फळाहार आणि पौष्टिक खाद्य पदार्थांचे सेवन केल्यानं पचन तंत्र चांगलं होतं. जेणे करून आपल्याला बद्धकोष्ठता, गॅस, अपचन सारख्या त्रासापासून मुक्ती मिळते. फळांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिज असतात जे शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात.

4 व्रत निर्बंध : उपवास करण्याच्या दरम्यान एखादी व्यक्ती ज्याला नशा करण्याची सवय आहे आणि त्यांनी या दिवसात कोणत्याही प्रकाराचा नशा न केल्यास जसे की आपण मद्यपान, सिगारेटचे सेवन न केल्यास आपल्या बिघडत असलेल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवता येतं आणि आपल्याला कोणत्याही प्रकाराची हानी होतं नाही.

5 मानसिक आरोग्य : या काळात एखादी व्यक्ती पूजा, आरती आणि इतर धार्मिक कार्य करतो. यामुळे त्याला मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो. आरोग्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक शांती आवश्यक असते. या मुळे अतिरिक्त ऊर्जा मिळते.

6 चांगलं आरोग्य बनविणारे पदार्थ : उपवासाच्या दरम्यान एखादा माणूस मीठ, आंबट, जास्त तेल, लसूण, कांदा, साखर, चहा, कॉफी, जास्त गोड पदार्थांचे सेवन न करता सैंधव मीठ, लिंबू पाणी, नारळपाणी, अननस ज्यूस, शेगांड्याचं पीठ, कद्दूच पीठ, ड्राय फ्रुट्स, कडुलिंब, मध, श्रीखंड, गूळ, कडुलिंबाची गोड पाने, काळी मिरी, हिंग, जिरे, खडीसाखर आणि ओवा या पदार्थांचा वापर करतो जे आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर असतं.

7 मन, वचन आणि कर्माने एकच राहावं : उपवास करताना मनातल्या विचारांकडे लक्ष देणं जरुरी असतं. आपल्या मनात वाईट विचार येतं असल्यास आपल्याला या उपवास करण्याचा फायदा कसा मिळणार? अश्याच प्रकारे आपण एखाद्या बरोबर संभाषण करत असताना आपल्याला आपल्या शब्दांवर लक्ष दिले पाहिजे खोटं किंवा अपशब्द बोलत असल्यास आपणास उपवासाचा कसा फायदा होणार? आपण काही ही करताना आपल्या केल्या जाणाऱ्या कृतीवर लक्ष द्यावे. अती झोपणं, संबंध करणं किंवा राग करणं हे सर्व गोष्टी उपवासात निषिद्ध असतात. या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

8 उपवासाच्या प्रकारांना समजणं : उपवासाचे बरेच प्रकार असतात. उपवासात एकाच वेळेला जेवण करणं त्याला ऍक्शन म्हणतात. असे करता येतं नाही आपण सकाळी फळाहार घ्या आणि संध्याकाळी जेवण करा. अश्या प्रकारे पूर्णकाळ उपवास करणे ह्याला पूर्णोपवास म्हणतात. अश्या प्रकाराच्या उपवासात फक्त पाणीच घेतात.

काही काळ फक्त रसाळ फळ किंवा भाज्यांवर राहणं. ह्याला फलोपवास म्हणतात. फळ आपल्याला आवडत नसल्यास किंवा सोसत नसल्यास केवळ शिजवलेल्या भाज्या खाव्या. नवरात्रात उपवास तर करतात, पण साबुदाण्याची खिचडी दोन्ही वेळेस खाल्ली जाते. काही लोकं खिचडीमध्ये दही मिसळून खातात. असा उपवास करण्यात काय अर्थ आहे. व्रत किंवा उपवासाचा अर्थ आहे आपण अन्नाचा त्याग करावा. जेवणात देखील अन्नाचा त्याग करणं महत्त्वाचं असतं.

9 उपवास न केल्याचे तोटे :
जर आपण उपवास धरत नसल्यास तर एके दिवशी आपली पचन क्रिया मंदावेल. आपल्या आतड्या सडू शकतात. पोटफुगु शकतं. पोट बाहेर पडू शकतं. आपण जर व्यायाम करतं नाही आणि आपले पोट देखील बाहेर येऊ देत असाल तर आपल्याला येणाऱ्या काळात एखादे गंभीर आजार होऊ शकतात. उपवासाचा अर्थ पूर्णपणे उपाशी राहून आपल्या शरीरास सुकवणे नसून आपल्या शरीरास आराम देणं असतं जेणे करून त्यामधून विषारी पदार्थ बाहेर पडतात. इतर प्राणी, पक्षी आपल्या शरीरास उपवास करून निरोगी ठेवतात. शरीर निरोगी असल्यावर मन आणि मेंदू देखील निरोगी राहतं. म्हणून रोग आणि शोक दूर करणाऱ्या चातुर्मासाच्या काही खास दिवसांमध्ये उपवास करावा. आपल्याला आपले डॉक्टर उपोषण करण्याचा सल्ला देण्यापूर्वीच आपण उपवास करावा.
10 उपवासाचे फायदे : कठीण उपवासाच्या पूर्वी आपल्या शरीरातील साखर संपेल किंवा जळेल मगच आपली चरबी गळेल. मग प्रथिन जळतात. ज्या प्रमाणात चरबी कमी होते त्याच प्रकारे प्रथिन देखील अधिक खर्च होते. ज्यावेळी शरीराची चरबी पूर्णपणे संपेल त्यावेळी शरीराचं काम प्रथिन खर्च करणं असतं. याचा अर्थ असा आहे की त्या वेळी माणसाच्या शरीरातील मांस आणि हाडे आणि कातडी खर्च होते. आपल्या कठीण काळात आपल्या अवयवांचा वापर किंवा क्षय होणं एका विशिष्ट नैसर्गिक नियमानुसार होतं.

सर्वप्रथम पोटातून अनावश्यक अन्नपदार्थ बाहेर पडतात. नंतर पोट आणि त्याच्या भोवतीची चरबी कमी होते. म्हणजे आधी कमी आवश्यक असलेले अवयव गमवावे लागते. नंतर त्यापेक्षा अधिक आवश्यक असलेले अवयव वापरण्यात येतात. सर्वात शेवटी अती आवश्यक असणारे अवयव कामी येतात नंतर आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे अवयव हस्तक्षेप करतात तेव्हा मृत्यू होते. जैन धर्मात याला संथारा म्हणतात.

उपवास धरणारा एखादा माणूस आपल्या आरोग्यास सुधारण्यासाठी तेव्हा पर्यंत उपवास करतो जो पर्यंत त्याचे पोट आत जात नाही आणि नरम होत नाही. हीच आपल्या शरीरास निरोगी ठेवण्याची योग्य पद्धत आहे.

अन्न तर शरीरास आवश्यक असतं. पण आपण आहारामध्ये शरीराला काय देत आहात हे ठरवणे देखील आवश्यक आहे. उपवास करणारा प्रथिन जळण्यापूर्वीच उपवास सोडून ज्यूस, फळे, आणि नंतर मग जेवण घेऊ शकता. आपल्याला नेहमी तेवढेच खायला हवं जितकी आपल्या शरीरास गरज असते. आहारात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि शरीरास आवश्यक असलेल्या प्रथिन आणि खनिज लवणांची काळजी घ्यावी.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Ram Navami Wishes in Marathi श्रीराम नवमीच्या हार्दिक ...

Ram Navami Wishes in Marathi श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. ...

Shri Ram Navami : श्रीराम नवमी पौराणिक पूजा विधी, शुभ ...

Shri Ram Navami : श्रीराम नवमी पौराणिक पूजा विधी, शुभ मुहूर्त
यंदा श्रीराम नवमी 21 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्री नवमी रामनवमी रुपात ...

रामनवमी या ‍दिवशी नक्की वाचावी श्रीरामाची पवित्र जन्म कथा

रामनवमी या ‍दिवशी नक्की वाचावी श्रीरामाची पवित्र जन्म कथा
रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्री रामाला ईश्वर मानत ...

भगवान रामाच्या पायात असे हे आश्चर्यकारक चिन्हे, जाणून आपणास ...

भगवान रामाच्या पायात असे हे आश्चर्यकारक चिन्हे, जाणून आपणास आश्चर्य होईल
श्रीरामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी प्रामुख्याने श्रीरामाच्या पायात 5 अश्या ...

तिन्हीसांजेला दिवा लावण्याचे महत्त्व

तिन्हीसांजेला दिवा लावण्याचे महत्त्व
हिंदू संस्कृतीत दिवा लावण्याचे अत्यंत महत्तव आहे. त्यातून तिन्हीसांजेला दिवा लावत ...

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...