testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बोडण हे ब्रह्मोदन किंवा बहुधन!

bodan
वेबदुनिया|
बोडण हा एक कुळधर्म, कुळाचार आहे. बोडण हा शब्द किंवा याचा असावा. मोटन म्हणजे बोडन म्हणजेच बोडण असा हा शब्द तयार झाला असावा. असे कृ.पा. कुळकर्णी यांचे मत आहे. विघ्नांचे मोटन म्हणजे चूर्ण ज्या आचाराने होते ते बोडण होय. महाराष्ट्रात कित्केच कोकणस्थ आणि देशस्थ ब्राह्मण आणि कर्नाटकातही अनेक ठिकाणी हा कुळाचार रूढ आहे. चार सुवासिनी आणि एक कुमारिका अशा स्त्रिया वर्तळाकार बसतात. एका परातीत पुरणावरणासह सर्व तयार स्वयंपाक ठेवतात. त्यात तूप, दूध, दहीचे स्नान त्यात ठेवलेल्या देवीला घालतात. आणि सर्व अन्न सर्वजणी कालवितात.
> कुमारिका ही देवी आहे असे समजून तिला पाहिजे असलेला पदार्थ मागण्यास सांगतात. तो पदार्ध मिसळून पुन्हा कालवितात. बोडण कालविताना एखाद्या स्त्रीच्या अंगातही येत असते. तिची ओटी भरून हळदकुंकू लावून तिला नमस्कार करतात. कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कार्य निर्विघ्न रितीने पार पाडल्याबद्दल तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यानंतरही बोडण भरण्याची पद्धत आहे.


यावर अधिक वाचा :

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...

national news
गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...

दु:खाचा दिवस 'मोहरम'

national news
याकूब सईद

चतुराय नमः।

national news
श्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...

आरतीत कापूर का लावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

national news
शास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...

गणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )

national news
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...

राशिभविष्य