गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

कन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा

नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल.
 
बटुक म्हणून याची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वत: पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तेथे शक्तिपीठांची स्थापना झाली. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते.
 
 
या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेले आहे. याचा एक अर्थ असा ही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचं फल सुरक्षित आहे. आपलं पुण्य इतर कोणाच्या पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंज्यालाही भोजनास निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे.