शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (14:58 IST)

नवरात्री विशेष : नवरात्रीमध्ये राशीप्रमाणे करा देवीची पूजा

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते 
 
जेव्हा पासून विश्वाची उत्पत्ती झाली आहे तेव्हा पासून जन्म-मृत्यू, जरा व्याधी, नफा-तोटा सुरूच आहे. प्रत्येक माणूस आपल्या अडचणीच्या वेळी आपल्या कुळदेवाच्या, इष्टदेवांच्या, पितृदेवांच्या किंवा गुरूंच्या सानिध्यात किंवा चरणी जातो. त्रिपुर सुंदरी, राजराजेश्वरी, प्रेमळ अशी आई दुर्गादेवी, ज्यांचे नऊ रूपाच्या व्यतिरिक्त देखील अनेक रूप आहेत, या नऊ रूपांपैकी कोणत्याही एकरूपाच्या शरणी जाऊन भक्त आपल्या देवी आईची पूजा करतो. तर त्या आपल्या भक्ताची काळजी घेउन त्यांच्या सर्व त्रास आणि अडचणी दूर करते. त्यासाठी आपल्याला त्यांचा शरणी जाऊन त्यांची आराधना आणि पूजा करावी. 
 
मेष - मेष राशीच्या लोकांनी मंगला देवी आईची पूजा करावी, आणि ॐ मंगला देवी नम: मंत्राचा जाप करावा.
 
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी कात्यायनी देवी आईची पूजा करावी आणि ॐ कात्यायनी नम: मंत्राचा जाप करावा.
 
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी आई दुर्गा देवीची पूजा करावी आणि ॐ दुर्गाये नम: मंत्राचा जाप करावा.
 
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी देवी आई शिवधात्रीची पूजा करावी आणि ॐ शिवाय नम: मंत्राचा जाप करावा.
 
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी आई भद्रकालीची पूजा करावी आणि ॐ कालरुपिण्ये नम: मंत्राचा जाप करावा.
 
कन्या - कन्या राशीच्या लोकांनी आई जयंतीची पूजा करावी आणि ॐ अम्बे नम: या 'ॐ जगदंबे नम:' मंत्राचा जाप करावा.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांनी आईच्या क्षमाशील रूपाची पूजा करावी आणि ॐ दुर्गादेव्यै नम: मंत्राचा जाप करावा.
 
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी देवी आई अंबेच्या रूपाची पूजा करावी आणि ॐ अम्बिके नम: मंत्राचा जाप करावा.
 
धनू - धनू राशीच्या लोकांनी आई दुर्गेच्या रूपाची पूजा करावी. ॐ दूं दुर्गाये नम: मंत्राचा जाप करावा.
 
मकर - मकर राशीच्या लोकांनी देवी आईच्या शक्ती रूपाची पूजा करावी, आणि ॐ दैत्य-मर्दिनी नम: मंत्राचा जाप करावा.
 
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी आई चामुंडाची पूजा करावी आणि ॐ चामुण्डायै नम: मंत्राचा जाप करावा.
 
मीन - मीन राशीच्या लोकांनी आई तुळजा भवानीची पूजा करावी आणि ॐ तुळजा देव्यै नम: मंत्राचा जाप करावा.
 
या सरळ आणि सोप्या मंत्राचा जाप केल्यानं जे भक्त आई भगवतीची पूजा करतात, देवी आई त्यांची सर्व इच्छा पूर्ण करते.