शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

कसे करतात श्री ललिता पंचमी व्रत, जाणून घ्या

नवरात्रोत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. याला उपांग ललिता व्रतही म्हणतात. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात. या पूजाविधीमुळे विद्या, धन, संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते.
 
ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती, विद्या प्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठी केले जाते. या दिवशी स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीची गाणी आरती करतात. स्वतः च्या परसदारी तयार झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्री प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे.


या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे.