शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

देवीपूजनाशी संबंधित काही कृती

देवीपूजनापूर्वी, तसेच नवरात्रीच्या काळात घरी किंवा देवळात सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. तसेच या रांगोळ्यांमध्ये पिवळा, निळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग भरावेत.
 
पूजनाच्या पूर्वी स्वत:ला मध्यमेने आज्ञाचक्रावर एका उभ्या रेषेत गंध लावावे.
 
अनामिकेने (करंगळीजवळील बोटाने) देवीला गंध लावावे.
 
देवीला मोगरा, शेवंती, निशिगंध, कमळ किंवा जुई फुले वाहावीत. 
 
ती एक किंवा नऊच्या पटीत असावी व त्या फुलांचे देठ देवीकडे करून वाहावीत.
 
फुले गोलाकार वाहून गोलातील पोकळी रिकामी ठेवावी.
 
चंदन, गुलाब, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी किंवा अंबर उदबत्तीने देवीची ओवाळणी करावी.
 
हातात दोन उदबत्त्या घेऊन उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वतरुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळाव्यात. 
 
मोगरा गंधाचे अत्तर अर्पण करावे. 
 
त्यानंतर देवीला किमान एक किंवा नऊच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात.