शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

शक्ती आराधनेचे पर्व- नवरात्र

ND
ND
आदिशक्त‍िच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्रौत्सव साजरा केला जातो. शक्ती विना शिव हे शवासमान आहे, असे म्हटले जाते. शक्तीमुळेच तर संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र अत्‍यंत महत्‍वपूर्ण आहे. नवरात्रात ब्रह्मांडातील सर्व शक्ती जागृत होतात. याच शक्तीने दैत्यांचा संहार केला आहे.

नवरात्रौत्सवासंदर्भात भारतातील प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. नवरात्रात आदिशक्तिच्या नऊ अवतारांची तिथीनुसार पूजा अर्चा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्‍मांडा, स्‍कंदमाता, कात्‍यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री, अशी देवीची नऊ रूपे आहेत.

गुजरातमध्ये नवरात्रौत्सवात गरबा, दांडियाने नवचैतन्य पसरते. बंगालमध्ये षष्‍ठीपासून दशमीपर्यंत देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात नवरात्रीत घटस्थापना करून आदिशक्तीचे विधीवत पूजन केले जाते. मध्‍यप्रदेश व राजस्‍थान नवरात्रौत्सवादरम्यान उपवास केले जातात. या काळात शक्तिपीठांच्या दर्शनास विशेष महत्‍व असते. पंजाबमध्ये नऊ दिवसांचे उपवास करून जगराता माताराणीची आराधना केली जात असते.

नवरात्रौत्सवात लहान मुलींना देवी स्‍वरूप मानले जात असते. कन्या भोजन देऊन त्यांना दक्षिणा दिली जाते. कन्या भोजनाची परंपरा जवळजवळ सर्व राज्यात सारखीच आहे. समाजातील मुली, स्त्रियांना सन्मानाने वागविले पाहिजे, असा नवरात्रौत्सवातून संदेश दिला जात असतो.