नोकियाचा टचस्क्रिन फोन बाजारात
मोबाईल फोन तयार करणारी जगातील प्रमुख कंपनी नोकियाने भारतात आपला टच स्क्रीन फोन बाजारात उरवला. यासह कंपनीने बिटा म्यूझिक स्टोअरही लॉच करण्याची घोषणा आज केली. नोकियाचे प्रबंध निदेशक ( भारत) शिव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात तीन कोटी नागरिकांकडे म्युझिक हँडसेट आहेत आणि या फोनच्या लॉंचींगनंतर ग्राहकांची संख्या आणखी वाढणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बाजारात नोकिया 5800 एक्सप्रेस म्युझिक भारतीय बाजारात दिसून येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.