शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2015 (15:01 IST)

100 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी जिओनी आता एक असा स्मार्टफोन घेऊन येतेय ज्यामध्ये 100 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीनं या फोनला ‘जिओनी एलाइफ ई-8’ असं नाव दिलंय. 41 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या नोकियाच्या ल्युमिया 1020 स्मार्टफोनहून हा स्मार्टफोन दुपटीनं चांगला असेल, असा दावा केला जातोय. ‘जिओनी एलाइफ ई-8’मध्ये कॅमेरा 23 मेगापिक्सलचा आहे. परंतु, यामध्ये लॉसलॅस ज्युम सेन्सर टेक्नॉलॉजी देण्यात आलीय. या टेक्नॉलॉजीमुळे 100 मेगापिक्सल क्वॉलिटीचा फोटो आणि 4-के क्वॉलिटीचा व्हिडिओ शूट करता येऊ शकेल. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात उतरवण्यात येईल, असं समजतंय. 
 
‘जिओनी एलाइफ ई-8’चे फिचर्स.. 4.6 इंचाची 1440 द 2560 पिक्सल स्क्रीन
 
2 गीगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर 3 जीबी रॅम 32 जीबी इंटरनल मेमरी
 
32 मेगापिक्सल कॅमेरा फिंगर पिंट्र सेन्सर मेटल फ्रेम 3520 मेगाहर्टझ बॅटरी