शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 15 नोव्हेंबर 2014 (09:09 IST)

5000 एमएच बॅटरीसोबत जियोनी मॅरेथॉन एम३

स्मार्टफोनमध्ये आता खूप नवीन नवीन मोबाईलचे लॉचिंग होत आहे. ज्या स्मार्टफोनमध्ये जास्त चांगले फिचर्स, त्याला बाजारात जास्त मागणी असते. त्याच बाबीचा विचार करून नवीन स्मार्टफोन जियोनी मॅरेथॉन एम३ आता जास्त काळ टिकणार्‍या बॅटरीसोबत बाजारात आणला जात आहे. त्यामध्ये ५000 एमएएचची बॅटरी टाकली गेली आहे. त्याच्या पहिले कंपनीने ४000 एमएएचच्या बॅटरीवाला डिव्हाईसला लाँच केले होते. १३,९९९ रुपयांमध्ये हा स्मार्टफोन इबेच्या साईटवर विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे. या फोनमध्ये काळा व पांढरा रंग आहे. हा स्मार्टफोन ५ इंचच्या एचडी डिस्प्ले, प्लास्टिक बॅककव्हर व ८ जीबीच्या इंटरनल स्टोअरेजसोबत आला आहे. मॅराथॉन एम३ अँड्रॉईड ४.४ किट कॅट ऑपरेटिंग सिस्टिमयुक्त आहे. यामध्ये १.३ जीएचजेड मीडिया टेक एमटी ६५८२ क्वॉड कोअर प्रोसेसर, माली ४00 एमपी२ जीपीयू आणि १ जीबीचा रॅम आहे. यामध्ये ड्युल सिम स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ३जी, वाय-फाय, ब्ल्युटूथ ४.0, ए-जीपीएससोबत जीपीएस, ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि २ मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याचसोबत ५000 एमएएचची नॉन रिमूव्हेबल बॅटरीयुक्त आहे.