बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (20:00 IST)

मोबाईल फोन गरम होण्यापासून कसे संरक्षण करावे ?

आजच्या काळात सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मध्ये स्मार्ट फोन सर्वात जास्त उपयोगात येणारी वस्तू आहे. सध्याच्या आधुनिक काळात त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. कधी-कधी हे डिव्हाईस वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये मोबाईल फोन उष्णतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. मोबाईल फोन उष्णता म्हणजे फोनच्या तापमानात वाढ होणे.फोन का गरम होतो.चला तर मग जाणून घेऊ या की फोन गरम होण्याचे काय कारण आहे.
 
1 इंटरनेट -
मोबाईल फोन गरम होण्याचे सर्वात मोठे कारण इंटरनेट आहे.आपण इंटरनेट साठी असा नेटवर्क वापरत आहात ज्यामुळे जास्त बॅटरी लागत आहे आणि इंटरनेट मंद चालतो. अशा परिस्थिती  मध्ये फोन अधिक गरम होतो.
 
2 बॅक ग्राउंड अ‍ॅप्स -
आपण फोन मध्ये मल्टिटास्किंग करू शकता, या मुळे एकत्ररीत्या बरेच काम केले जाणे शक्य आहे.मोबाईल मध्ये वापरले जाणारे अ‍ॅप्स बॅकग्राऊंड मध्ये काम करतात या मुळे देखील फोनच्या बॅटरीचा वापर अधिक होतो आणि फोन गरम होतो.
 
3 मोबाईल ब्राईटनेस -
बरेच वापरकर्ते मोबाईलची ब्राईटनेस पूर्ण ठेवतात, या मुळे देखील बॅटरी जास्त वापरली जाते आणि फोन तापतो.म्हणून गरजेनुसार ब्राईटनेस वाढवावी.
 
4 मोबाईल गेम्स खेळणे- 
आपण मोबाईल मध्ये रॅम,ग्राफिक कार्ड आणि मोबाईलचा प्रोसेसर सोडून अधिक गेम्स खेळात असाल तर बऱ्याच गोष्टी एकाच वेळी वेगाने काम करतात, या मुळे मोबाईल फोन गरम होतो.
 
* फोन गरम होण्याची समस्या कशी टाळावी- 
 
1 आपल्या मोबाईलमधील बॅकग्राऊंड डेटाच्या पर्याय निवडून फोनच्या बॅकग्राऊंड डेटावर प्रतिबंध लावू शकता. या मुळे बॅकग्राऊंड मध्ये चालणारे अ‍ॅप्स डेटाचा वापर करणार नाही आणि फोन गरम होणार नाही.
 
2 मोबाईलची ब्राईटनेस कमी करा,जेणे करून फोन ची बॅटरी लवकर वापरली जाणार नाही आणि फोन गरम होणार नाही.
 
3 फोन उन्हात ठेवत असाल तरी ही  तो जास्त गरम होणार, कारण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मध्ये उष्णता पटकन हस्तांतरित होते, म्हणून फोन उन्हात वापरू नका.
 
4 फोन मध्ये गेम्स खेळत असाल तर त्या मुळे देखील बॅटरी जास्त वापरली जाते आणि फोन गरम होतो.फोन मध्ये गेम्स खेळू नये.
 
5 फोन गरम झाल्यावर रिस्टार्ट करा आणि काही काळ बॅटरी फोन मधून काढून ठेवा, ज्यामुळे फोन चे तापमान सामान्य होईल.