शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (16:10 IST)

या दोन स्मार्टफोनवर 4000 रुपयांची सूट

infinix-mobile-price-cut-4000
कमी किमतीत प्रिमियम डिझाइनचे स्मार्टफोन बनविणारी कंपनी इन्फिनिक्स मोबाईल्सने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये 4000 रुपये सवलत देण्याचे जाहीर केले आहे. 
 
येथे जारी केलेल्या एका वक्तव्यात कंपनीने म्हटलं आहे की फ्लिपकार्टने येथे तीन-दिवसीय सेल्स फेस्टिवल दरम्यान स्मार्ट 2 आणि हॉटएस3एक्स स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 2400 आणि 4000 रुपये कमी केली आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी रॅम असलेल्या स्मार्ट 2 ची किंमत 7999 रुपयांहून कमी होऊन आता 5599 रुपये एवढी झाली आहे. याच प्रमाणे 3 जीबी रॅम आणि 32 जीबी रॅम असलेल्या हॉटएस3एक्स स्मार्टफोनची 10999 रुपयांची किंमत कमी होऊन 6999 रुपये करण्यात आली आहे.
 
यासह, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड देखील प्रदान केले जात आहे. स्मार्ट 2 ला अँड्रॉइड ओरियोसह लॉन्च केले आहे आता ते Android Pie वर अपग्रेड केले जाईल. ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेडचे फायदे कंपनीच्या सर्व ग्राहकांना मिळतील आणि सर्व फोन मे महिन्यापर्यंत अपग्रेड करण्यात येतील.