शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

रिलायन्स Jio चा 1000 रुपयात 4जी स्मार्टफोन

आपल्या 4जी सेवेने टेलिकॉम मार्केटमध्ये प्रचंड एंट्री करणारी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एक आणखी भेट घेऊन येत आहे. सूत्रांप्रमाणे कंपनी लवकरच देशातील सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करणार आहे.
 
या स्मार्टफोनची किंमत एक हजार रुपए असून हा फोन पुढील वर्षी जानेवारीत लाँच केला जाऊ शकतो. तरी कंपनीने याबाबत आधिकारिक घोषणा केलेली नाही. 
 
सूत्रांप्रमाणे फोनमध्ये स्प्रेडट्रम 9820 प्रोसेसर लावण्यात आले आहे. यासह कॅमरा, ब्लूटूथ, वाई-फाई आणि मोठी स्क्रीन डिस्प्ले असण्याची आशा आहे. बाजारात रिलायन्स लाईफचे हँडसेट आधीपासूनच उपलब्ध असून त्यांची सुरुवाती किंमत 2999 रुपये आहे.
 
जर आता कंपनीने 1000 रुपयात स्मार्टफोन लाँच केला लोकं हा फोन हातोहात खरेदी करतील. उल्लेखनीय आहे की जेव्हापासून रिलायन्सने जिओ सेवा लाँच केली आहे तेव्हापासून 4जी स्मार्टफोनची डिमांड वाढली आहे. ही डिमांड लक्षात घेत अनेक कंपन्यांनी 
 
आता केवळ 4 जी स्मार्टफोन लाँच करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.