testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ शुक्रवारी उघडणार

lasalgaon
Last Updated: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (10:19 IST)
शुक्रवार पासून देशात सर्वाधिक मोठी असलेली आणि मुख्यतः कांदा बाजार पेठ असलेली लासलगाव बाजार समितित नियमित कांदा आणि धान्य
लिलाव होणार असल्याची माहिती बाजारसमितीकडून देण्यात आली आहे. व्यापारी, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना चेक किंवा ऑनलाइन पेमेंट देण्यात
येईल असे सांगण्यात आले आहे.केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. त्यामुळे बाजारातील वजनदार समजल्या जाणाऱ्या नोटा नसल्यामुळे करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत.आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणारी लासलगाव बाजारसमितीदेखील अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र आज लासलगाव येथील व्यापारी, संचालक मंडळ यांच्या बैठकीत तोडगा निघाला असून शेतकऱ्यांना चेक किंवा ओंनलाईन पेमेंट दिले जाणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळालेला असून माल बाजारात विक्रीसाठी आणण्यात यावा असे आवाहन बाजारसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :