1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:36 IST)

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

Jio users
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि 69 रुपये आहे. यापूर्वीही हा प्लॅन कंपनीने लाँच केला होता पण तो हटवून पुन्हा हा प्लॅन रिलाँच केला आहे. तसेच या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये घट करण्यात आली आहे.
 
जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंगसाठी 250 मिनिट, 2 जीबी 4जी डेटा आणि 25 एसएमएस दिले जाणार आहेत. तसेच या प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांची आहे.
 
जिओच्या 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट, 25 एसएमएससह 7 जीबी डेटा दिला जाईल. या प्लॅनची व्हॅलिडीटीही 14 दिवसांची आहे. या दोन्ही प्लॅनचे रिचार्ज जिओच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.