Widgets Magazine
Widgets Magazine

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण भविष्यात हे काम रोज्याचा रोज करण्याची गरज उरणार नाही. कारण, यापुढे एकदा चार्ज केलेला मोबाइल तब्बल तीन महिने चार्ज करण्‍याची गरज लागणार नाही.
चकित झालात ना? पण हे खरे आहे. सध्याच्या शंभरपट कमी ऊर्जेचा वापर करणार्‍या मोबाइल प्रोसेसरचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. मिशिगन आणि कॉर्नेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. मॅग्नेटोइलेक्ट्रि मल्टीफेरिक असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण चुंबकीय ध्रुवीय फिल्म तयार करणार्‍या अणूंचा थर पातळ करते. याच सिद्धांताचा वापर करून बायनरी कोड 1 आणि 0 कडे पाठविण्यासाठी करण्यात येतो, ज्यावर आपल्या संगणकाचे काम चालते.
 
मोबाइलमधील सध्याचे प्रोसेसर सेमीकंडक्टर प्रणालीचा वापर करून बनवले जातात. या प्रोसेसरना सतत वीजपुरवठ्याची गरज असते. याउलट, मॅग्नेटोइलेक्ट्रिक मल्टीफेरिक्स यंत्रणेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रोसेसरला विजेच्या कमीत कमी दाबाची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा प्रोसेसर विजेचा केवळ एक छोट्यात छोटा भाग वापरून डेटा मिळवू शकतो किंवा पाठवू शकतो.
 
जगभरातील सध्या ऊर्जा वापरापैकी पाच टक्के ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वापरली जाते. 2030 पर्यंत हेच प्रमाण 40 ते 50 टक्के इतके होणार आहे. त्यामुळे हे नवे तंत्रज्ञान ऊर्जा वापराच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असे मत लॉरेन्स वर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील सहायक संचालक राममूर्ती रमेश यांनी व्यक्त केले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

स्मार्टफोनवर पुरूषांपेक्षा महिलाच जास्त पाहतात पॉर्न

मुंबई- पुरूषांमध्ये पॉर्न पाहण्याची प्रवृत्ती अधिक फोफावली आहे असा तुमचा समज असेल तर तो ...

news

जिओने होम डिलिव्हरी सेवा सुरु केली

ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी होम डिलिव्हरी सेवा जिओनं सुरु केली आहे. आतापर्यंत जिओचं सिम ...

news

सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर चिनीच

जगातले सर्वाधिक वेगवान व अचूक महासंगणक म्हणून आजही दोन चिनी सुपर कॉम्प्युटर्सच कायम ...

news

iBall ने लाँच केला मोबाइलच्या किमतीत विंडोज 10 वाला लॅपटॉप

जर तुम्हाला ही कमी किमतीत चांगला लॅपटॉप विकत घ्यायचा असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होणार ...

Widgets Magazine