मोटोरोलाचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच होणार

Last Modified बुधवार, 25 डिसेंबर 2019 (15:37 IST)
मोटोरोलाचा सर्वात महागडा फोन आणि पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. Motorola Razr (2019) कडून हा फोन लाँच करण्यात्या तयारीत आहे. मोटोरोलाने रेझर 2019 ला भारतात लाँच करणसाठी टीझर लाँच केला आहे. ट्विट करून मोटोरोलाने ही टीझर लाँच केले आहे. मोटोरोलाच्या या फोल्डेबल स्मार्टफोनला गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच करण्यात आले होते. या फोनची विक्री जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. या फोनची टक्कर सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड
आणि हुवेईच्या मेट एक्ससोबत राहणार आहे.

मोटोरोला इंडियाने ट्विटवरवर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. Motorola Razr (2019) ला लवकरच भारतात लाँच करणत येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. परंतु, कंपनीने लाँच करण्याची
तारीख अद्याप जाहीर केली नाही. कंपनीने नोव्हेंबरमध्ये याच्या लाँचिंगनंतर भारतीय वेबसाइटवर एक रजिस्ट्रेशन पेज तयार केले होते. या ठिकाणी ग्राहकांना अपडेटेड माहिती मिळू शकत आहे. कंपनी लवकरच हा फोन लाँच करणार असली तरी या फोनच्या किमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. गेल्या महिन्यात अमेरिकेत करण्यात आलेल्या घोषणेच्या जवळपास या फोनची किंमत असू शकते. अमेरिकेत या फोनची किंमत 1,499 डॉलर म्हणजेच भारतात या फोनची किंमत 1 लाख 6 हजार रुपये असू शकते. तर सॅमसंगच गॅलेक्सी फोल्डची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये इतकी आहे.
Motorola Razr (2019) चे खास वैशिष्ट्य म्हणजे यात अनफोल्डेड स्टेट 6.2 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी एचडी (876x2142 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटमध्ये 2.7 इंचाचा (600x800 पिक्सल) क्विक व्ह्यू डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटचा हा क्विक डिस्प्ले सेल्फी कॅप्चर करण्यासाठी़, नोटीफिकेशन पाहाण्यासाठी आणि म्युझिक नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ह्या फोनमध्ये 6 जीबी रॅम सह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेड असताना सेल्फी काढता येऊ शकणार आहे. तर 5 मेगापिक्सलचा सेकंडरीकॅमेरा डिस्प्ले नॉच देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता 2,510 एमएएच दिली आहे. फास्ट चार्जिंग करण्यासाठी 15 W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत असून जगभरातून ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे ...

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ

शिवभोजन थाळीच्या संख्येत दुप्पट वाढ
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना ...

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा इशारा

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा  इशारा
किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही उडी घेतली ...