Widgets Magazine

नोकिया 8 होणार 16 ऑगस्ट रोजी लाँच !

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 27 जुलै 2017 (11:29 IST)
एचएमडी ग्लोबलकडून नोकिया 8 हा स्मार्टफोन 16 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच टिप्स्टर इव्हान ब्लासने या फोनचा कथित फोटो ट्विटरवर शेअर केला होता. या फोनचा लाँचिंग कार्यक्रम लंडनमध्ये होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या फोटोनुसार नोकिया 8 ला मेटल बॉडी असेल. तर व्हर्टिकल ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनचा फ्रंट लूकही आकर्षक आहे. समोर होम बटण देण्यात आलं आहे, जे फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. एचमएडी ग्लोबलकडे नोकियाचे हक्क आहेत. या कंपनीने सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे नोकिया 8 मध्ये Zeiss लेंस असेल, असा अंदाज लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला. यापूर्वीच्या लीक रिपोर्टनुसार, नोकिया 8 मध्ये क्वालकॉम लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर, 5 इंच आकाराची आणि 5.5 इंच आकाराची स्क्रीन असे दोन व्हेरिएंट, 4 किंवा 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज आणि 23 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल.


यावर अधिक वाचा :