शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 मार्च 2015 (15:04 IST)

Samsung-Appleला मागे सोडून 4जी हँडसेटमध्ये चायनाची Xiaomi No.1वर

चिनी हँडसेट निर्माता कंपनी जियाओमी या वर्षी जानेवारी महिन्यात भारताची शीर्ष 4जी हँडसेट विक्रेता बनली आहे. या कंपनीने जगातील सर्वात जास्त स्मार्टफोन विकणारी कंपनी सॅमसंग आणि ऍपलला देखील पछाडले आहे.

हे वृत्त आज सायबरमीडिया रिसर्च ने म्हटले. बाजार अनुसंधान कंपनीने या महिन्यात म्हटले होते की आयफोन निर्माता कंपनी, जियाओमी ऑक्टोबर-डिसेंबर 2014च्या दरम्यान देशात 4जी एलटीई उपकरण विकणारी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.  
 
सायबर मीडिया रिसर्चच्या ताजा अहवालानुसार जियाओमी 4जी एलटीई उपकरण बाजाराची 30.8 टक्के भागीदारीसोबत जानेवारीत शीर्षावर राहिली. यानंतर क्रमश: ऍपल (23.8 टक्के), सॅमसंग (12.1 टक्के), एचटीसी (10 टक्के) आणि मायक्रोमॅक्स (8.3 टक्के) क्रमांकावर राहिले.  
 
ऑक्टोबर -डिसेंबर 2014च्या त्रैमासिकात 10 लाखांपेक्षा जास्त 4जी उपकरण भारतातील बाजारात आले ज्यात स्मार्टफोन, टॅबलेट आणि  डाटा कार्ड सामील आहे.