शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2015 (11:43 IST)

अँड्रॉईड यूजर्ससाठी गुगलचं क्लॉक अँप लाँच

गुगलचं डिझायनर क्लॉक आता गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झालं आहे. अँड्रॉईड यूजर्ससाठी गुगलने हे खास स्टालीश घड्याळ डिझाइन केलं आहे.
 
अँड्रॉईड यूजर्स जर त्यांच्या डिजीटल क्लॉकमुळे समाधानी नसतील, तर ते गुगल अँपचा पर्याय निवडू शकतात. गुगल नेक्ससमध्ये तुम्हाला एका क्लॉक अँपचा पर्याय उपलब्ध असेल.
 
गुगल अँपवर यूजरच लोकेशन रजिस्टर होतंच, सोबत वर्ल्ड क्लॉकचाही पर्याय आहे. स्टॉपवॉच, अलार्म, टायमर यासारखे नेहमीचे विजेट्सही आहेतच. मात्र हे क्लॉक अँप कस्टमाईज्ड आहे. म्हणजेच गुगल अपग्रेड होताच क्लॉकही अपग्रेड होईल.
 
गुगलने रमजान अँपही लाँच केलं आहे. यात रमजान महिन्याशी निगडित सर्व माहितीपासून इफ्तारच्या वेळा आणि ट्राफिकचीही माहिती मिळेल.