शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By wd|
Last Modified: सॅनफ्रान्सिस्को , बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (12:51 IST)

अ‍ॅपलने लॉन्च केले बिग स्क्रीनचे iphone6 आणि iphone6+

अ‍ॅपल कंपनीने 'आयफोन-6' आणि 'आयफोन6+' हे मोठ्या स्क्रीनचे दोन आयफोन लाँच केले. या आयफोनची स्क्रीन 5.5 इंच आहे. आयफोन-6 ची किमत 199 डॉलर म्हणजे 12105 रुपये तर 'आयफोन +' ची किंमत 299 डॉलर म्हणजेच 18180 रुपये राहणार आहे.
 
आतापर्यंतच्या आयफोनच्या तुलनेत हे दोन्ही मॉडेल 50 टक्के आणि इतर फोनच्या तुलनेत 25 टक्के अधिक वेगवान राहाणार आहेत. अ‍ॅपलने अ‍ॅपल वॉच आणि अ‍ॅपल पे देखील लॉन्च केला आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी आयफोन सिरीजमधील हे सर्वात आधुनिक मॉडेल असल्याचे म्हटले आहे.
 
आयफोन-6 ची स्क्रिन साइज वाढविण्यात आली आहे.  यामुळे मोबाईलवर व्हिडिओ पाहाणे आणि इंटरनेट ब्राउजींगची सहज सोपी होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अ‍ॅपल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही फोन 26 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात उपलब्ध होतील.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.