शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By वेबदुनिया|

आयफोन 5 एस महागडाच

अँपलचा आयफोन 5 एस हा भारतीयांसाठी सर्वात महागडा फोन ठरला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात आयफोन 5 एसची किंमत जास्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरपासून आयफोन 5 एस विक्रीसाठी उपलब्ध असून याची किंमत तब्बल 53,500 रुपे आहे.

WD


गार्डियन आणि मोबाइल अनलॉक या संस्थांनी केलेल्या जागतिक सर्वेक्षणात भारतात हा फोन महाग असल्याचे म्हटले आहे. जवळपास 47 देशांमध्ये आयफोन 5 एस च्या किमतीचे सर्वेक्षण करण्यात आले. संबंधित देशांतील चलन, स्थानिक कर आणि सरासरी दरडोई उत्पन्न यांच्यानुसार हा फोन कुठल्या देशात किती महाग आहे, हे ठरवले गेले. त्यानुसार अमेरिकेत 16 जीबीच्या आयफोन 5 एस ची किंमत 707.41 डॉलर आहे. तर जॉर्डनमध्ये 1091.01 डॉलरला आहे. तर भारतात याची किंमत जवळपास 857.75 डॉलर असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तिच्या स्तरानुसार केलेल्या सर्वेक्षणानुसार आयफोन 5 एस भारतीयांसाठी जास्तच महाग आहे. भारतीयांचे एकूण देशांतर्गत उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत याची किंमत अधिक असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. आयफोन 5 एसची किंमत भारतीयांच्या दरडोई उत्पन्नाच्या 22.3 टक्के आहे. चीनमध्ये ग्राहकांना आयफोन 5 एस खरेदी करण्यासाठी त्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या 10 टक्के कमी किंमत मोजावी लागत आहे. तर कतारमध्ये ग्राहकांना जीडीपीच्या केवळ 0.76 टक्के किंमत लागत आहे.