शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2015 (11:48 IST)

आयफोन 6, 6+च्या किमतीत मोठी कपात

अँपलने अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये आयफोन 6S आणि 6S+ सह अनेक गॅझेट्स लॉन्च केले. जगातील पहिल्या क्रमांकाची टेक कंपनी अँपल आता प्लास्टिक बॉडीवाला आयफोन 5C तयार करणार नाही. त्यासोबतच अँपल आता बाजारात आयफोन 5S, 6 आणि 6+ चे गोल्ड व्हेरिएंटही बाजारात विक्रीसाठी आणणार नाही. आणि विशेष म्हणजे या तिन्ही हँडसेट्सच्या किमतीही कमी केल्या आहेत.
 
iPhone 5s च्या 16GB मॉडेलची किंमत 35 हजार रुपयांवर आली आहे आणि 32GB  मॉडेलची किंमत 40 हजार रुपये झाली आहे. iPhone 6 च्या 16 GB ची किंमत 52 हजार रुपये, तर 64 GB ची किंमत 62 हजार रुपये झाली आहे. iPhone  6s  प्लस 16GB 62 हजार रुपये, तर 64GB  मॉडेल 72 हजार रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. अँपलच्या वेबसाईटवर आयफोन 5S, 6 आणि 6+ च्या गोल्ड व्हेरिएंटची मॉडेल उपलब्ध नाहीत. आता युजर्सना केवळ सिल्व्हर आणि स्पेस ग्रे रंगाचे हँडसेटच खरेदी करता येणार आहेत. मात्र, नुकतेच लॉन्च झालेले लेटेस्ट आयफोन 6S आणि 6S+ सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड आणि रोड गोल्ड रंगांमध्ये बाजारात उपलब्ध असणार आहेत.