शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By वेबदुनिया|

आला दोन स्क्रीन असणारा स्मार्ट फोन...

PR
आतापर्यंत स्मार्ट फोनमधील बरेच नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत. रशियाची कंपनी योटाने एक असा फोन लाँच केला आहे, ज्याच्या दोन्ही बाजूच्या पॅनलमध्ये स्क्रीन आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला ऍक्टिव स्क्रीन आहे. हा फोन लाँच झाल्याने आता मोबाइल कंपन्यांमध्ये नवीन स्पर्धा सुरू होणार आहे.

पुढील पानावर, काय खास आहे या मोबाइलमध्ये ...


WD


हा एक ड्‍युल सिम फोन आहे. योटाफोनच्या फ्रंटमध्ये 4.3 इंचेचा डिस्प्ले आहे, ज्यात हाय रेजल्यूशनसोबत व्हिडिओ बघू शकता. याच्या बॅक पॅनलवर 640x360 पिक्सल रिझोल्यूशनच 4.3 इंचेचा इलेक्ट्रॉनिक पेपर डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमुळे बरेच फीचर्सचे काम होऊ शकतात.

WD
हा फोन 1.7 गीगाहर्ट्ज डुअल-कोर प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 32 जीबी इंटर्नल मेमरी आणि एड्रॉयड 4.2.2 जैली बीनवर काम करतो. फोनमध्ये 1800 एमएएचची बॅटरी लागली आहे. कंपनीने या फोनला रशिया, ऑस्ट्रिया, फ्रांस, ‌जर्मनी आणि स्पेनमध्ये लाँच केला आहे. पुढील वर्षापर्यंत कंपनीला याला 20 देशांमध्ये लाँच करायचा आहे.

रशियात योटाफोनची किंमत 19,990 रूबल्स (भारतीय मुद्रेत किमान 37,500 रुपए) आहे. युरोपमध्ये हा 499 युरो (भारतीय मुद्रेत किमान 33,900 रुपये )त मिळेल. बॅक पैनलवर एलईडी फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सल बॅक कॅमरा आहे जेव्हाकी फ्रंटमध्ये कॅमेरा 1 मेगापिक्सलचा आहे. कनेक्टिविटीसाठी यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 4 जी एलटीई सारके फीचर्स आहे.

(Photo courtesy: yotaphone.com)