शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By wd|
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (14:28 IST)

'इन्स्टाग्राम'ने केला तीस कोटी यूजर्सचा आकडा पार

फोटो शेअरिंगची प्रसिद्ध सोशल साईट 'इन्स्टाग्राम'ने तीस कोटी यूजर्सचा आकडा पार केला आहे. कंपनीने नुकतेच ऑथेन्टिकेट सेलिब्रिटी मेंबर्ससाठी नव्या सिस्टिमची सुरुवात करीत असताना याबाबतची घोषणा केली. याबरोबरच इन्स्टाग्रामने 'ट्विटर'लाही मागे टाकले आहे. ट्विटर ने गेल्या सप्टेंबरमध्ये आपले 28.4 कोटी यूजर्स असल्याचा दावा केला होता. 'इन्स्टाग्राम'ने अवघ्या चारच वर्षांमध्ये प्रगती केली असून, सध्या त्यावर सात कोटी फोटो आणि व्हिडिओ आहेत.