शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2015 (14:13 IST)

एक्सपिरीया Z4v लॉन्च, अर्धा तास पाण्यात बुडला तरी नो टेन्शन

जपानची स्मार्टफोन तयार करणारी कंपनी सोनीने आपल्या एक्सपिरीया सीरिजचा आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सोनीने नुकतेच एक्सपिरीया झेड 4 आणि एक्सपिरीया Z3+ ग्लोबली लॉन्च केले आहेत. आता एक्सपिरीया सीरिजचा नवा स्मार्टफोन एक्सपिरीया Z4v लॉन्च केला आहे. या हँडसेटची अमेरिकेत व्हेरीझॉन वेबसाईटवरुन विक्री केली जाणार आहे. सोनीने या स्मार्टफोनच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.
 
एक्सपिरीया Z4v या स्मार्टफोनचं सोनी कंपनी भारतात कधी लॉन्चिग करणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती सोनीकडून देण्यात आली नाही. मात्र, गॅजेट तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एक्सपिरीया Z4v जुलै महिन्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचं वेगळेपण म्हणजे, हा वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. 1.5 मीटरपर्यंतच्या पाण्यात अर्धा तास बुडाला, तरी फोन खराब होणार नाही.
 
एक्सपिरीया Z4v चे फीचर्स : ऑपरेटिंग सिस्टिम: Z4v मध्ये अँड्रॉईड लॉलिपॉप 5.0
 
स्क्रीन: 5.2 इंचाचा संपूर्ण एचडी डिस्प्ले
 
डिस्प्ले: 1440x2560 पिक्सेल रेझॉल्युशन
 
प्रोसेसर: 64 बिटचा ऑक्टा-कोरचा (क्वाड कोर 1.5 GHz+क्वाड कोर 2 GHz) क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810
 
रॅम: 3GB  
 
कॅमेरा: रेअर कॅमेरा 20.7 मेगापिक्सेल ऑटोफोटस, 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
 
बॅटरी: Xperia  Z4v मध्ये 2930mhची बॅटरी दिली गेली आहे. या स्मार्टफोनमध्ये बिल्ट-इन वायरलेस चार्जिग फीचर दिला आहे.