शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:48 IST)

एम-इंडिकेटरवरून करा आता चॅटिंग

गेल्या पाच वर्षात मुंबईतील लोकल प्रवाशांच्या मोबाइलमध्ये स्थान मिळविलेल्या एम-इंडिकेटर या मोबाइल अँप्लिकेशनने आता अधिक सोशल व्हायचे ठरविले असून नू व्हर्जनमध्ये ट्रेन वेळेवर आहेत की नाहीत हे प्रवाशांना त्याच मार्गावरील सहकारी प्रवाशांशी लाइव्ह चॅट करून समजणार आहे.
 
गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवरून सुटणार तसेच स्टेशन कोणत्या दिशेला येणार हे प्रवाशांना विचारावे लागणार नाही. एम-इंडिकेटरवरच हे सर्व दिसेल असे या अँपच्या नव्या रूपाबद्दल सचिन टेके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच प्रवाशांना त्या मार्गाच्या प्रवाशांशी लाइव्ह चॅट करून ताजी माहिती मिळवणे शक्य होणार आहे. तसेच जीपीएस सिस्टीममुळे त्याच मार्गावरील प्रवाशांना चॅटिंग करता येईल, त्यामुळे अनावश्क गोंधळ टळणार आहे.
 
‘ए’ ते ‘बी’ फीचर्समध्ये पनवेलहून बोरिवलीला जाणार्‍या प्रवाशाला व्हाया वडाळा की व्हाया दादर जाणे सोयीचे आहे हे इंडिकेटर सांगणार आहे. त्यावेळी चेंजिंग पॉइंटला गाडी उपलब्ध आहे का हे अँप सुचविणार आहे, तर प्लॉन द जर्नी या सुविधेत जर तुम्हाला सकाळी 9 वाजता बोरिवलीला ठाण्याहून पोहोचायचे असेल तर तुम्ही किती वाजता ठाणे सोडले पाहिजे हे अँप सुचवेल. तसेच लाइव्ह ट्रेन स्टेटसमध्ये  प्रवासी आपल्या सहकार्‍याला मॅसेज पास करू शकतील, तसेच फास्ट आणि स्लो ट्रेन फिल्टरमुळे हव्या त्या ट्रेनची माहिती मिळेल आणि न्यूज सेक्शनमध्ये ताज्या घडामोडी कळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.