शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 6 नोव्हेंबर 2014 (14:03 IST)

कॉल केल्यावर नाही दिसणार मोबाइल नंबर

महिलांना मोबाईलवर त्रास देणार्‍यांची संख्या वाढत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी लवकरच अँप येणार आहे. एखाद्या महिलेने कोणाला कामानिमित्त कॉल केल्यास अँपच्या मदतीने समोरील व्यक्तीला मोबाईल नंबर न दिसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून ती व्यक्ती कॉल करणार्‍या महिलेला मोबाईलवरून त्रास देऊ शकणार नाही.

सिंगापूरमधील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपनी ब्लूनटेक डॉट नेट भारत दोन अँप्स आणणार आहे. शिल्डमी आणि स्टीटमी अशी या दोन्ही अँप्सची नावे आहेत. डेटिंग वेबसाईटचा वापर सध्या मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. त्याची लोकप्रियता पाहता त्याद्वारे महिलांना त्रास देणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. अशा परिस्थितीत महिलांना फोन प्रायव्हसी राखणे कठीण जात आहे. या पार्श्‍वभूमीवर स्टीटमी मोबाईल क्रमांक हा महिला फोनधारकांची प्रायव्हसी सुनिश्‍चित करण्याचे काम करणार आहे. हे अँप्स भारतात दाखल करण्यासाठी कंपनी सध्या देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांशी चर्चा करत आहे. अशा स्वरूपाची सेवा देण्याआधी कंपन्यांबरोबर सल्लामसलत करत त्याचे दुष्परिणामांवरही चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच ही अँप्स सुरू केली जाणार आहेत. बहुधा मार्च २0१५ पूर्वी ही अँप्स वापरण्यास उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही अँप्स फोन प्रायव्हसीसाठी आहेत. शिल्डमी हा अँप्स फक्त व्यावसायिक रूपासाठी केला जाणार आहे.