शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (12:13 IST)

गुगलचा स्मार्टफोन भारतात लाँच

लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने आपला बहुप्रतीक्षित ‘अँड्रॉईड वन’ स्मार्टफोन सोमवारी लाँच केला असून सध्या भारतात स्वस्तातल्या स्मार्टफोन्सची चलती आहे. गुगलने याच धर्तीवर हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. सहा हजार 399 पासून पुढे या नव्या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. यासाठी गुगलने मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइस या तीन वेगाने वाढणार्‍या भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. 
 
सर्व प्रथम हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला असून फिलिपाईन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्येही आगामी महिन्यांमध्ये तो लाँच केला जाणार आहे. अँड्रॉईड वनचा विस्तार वाढवण्यासाठी गुगल लवकरच एसर, अलकॅटल वन टच, झोलो, एचटीसी, लाव्हा, इंटेक्स, एसस आणि लेनोव्हो या कंपनींशीही भागीदारी करणार आहे. जूनमध्ये गुगलने या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली होती. नेक्सस आणि गुगल प्ले एडिशनमधील उत्पादनांप्रमाणेच अँड्रॉइड वन स्मार्टफोनमध्येही गुगलकडून वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्सची सुविधा दिली जाणार आहे. याबरोबरच ‘प्ले ऑटो इन्स्टॉल्स’मधून या फोनसाठी शिफारस केलेल्या अँपची यादी उपलब्ध केली जाणार असल्याचे पिचाई यांनी सांगितले. सध्या हा फोन खरेदीसाठी ऑनलाईन साईटवर उपलब्ध करण्यात आला असून ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दुकानांमध्ये उपलब्ध असणार आहे.