शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (14:50 IST)

जिओनीची स्मार्टफोन मालिका

जिओनी कंपनीने भारतामध्ये तिच्या उत्पादनांच्या दालनामध्ये आणखी वाढ करणे सुरू ठेवले आहे. जिओनीने एलटीई फोन्सवर विशेष भर देऊन चार नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. व्ही६एल एलटीई, पी५एल एलटीईसहित दोन डिव्हाईसेस त्यात आहेत. तसेच पी४एस आणि पी६ डिव्हाईसेसदेखील आणले आहे. जे डिसेंबर मध्यापर्यंत बाजारपेठेत उपलब्ध होतील. तसेच बहुप्रतीक्षित जिओनी एलाईफ एस ५.१ आणि एस ५.५ एलटीई डिव्हाईसेससही कंपनीच्या शैलीदार एस सीरिजमधून सादर केले आहेत तसेच २0१५ पासून १0 हजार रुपयांच्या वरील सर्व डिव्हाईसेस हे एलटीई एनेबल्ड असणार आहेत, असेही जिओनी कंपनीने जाहीर केले आहे.