शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2015 (16:20 IST)

जीमेल अँपमध्ये नवे ऑप्शन सुरू!

स्मार्टफोनमुळे मेल करणं फारच सोपं झालं आहे. एका क्लिकसरशी आपण आपला महत्त्वाचा मेल पाठवू शकतो. त्यामुळेच अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला जीमेल अँप पाहायला मिळतं. मात्र, या अँपमध्ये काही पायाभूत आणि महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्याच्या तक्रारी जीमेलला करण्यात आल. याची दखल घेत अखेर जीमेलने इनबॉक्समध्ये डिलिट बटन आणि साइन सपोर्टचा ऑप्शन सुरु केला आहे. 
 
अँपमध्ये काही गोष्टींची कमतरता असल्याचे जीमेलच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी हे नवे ऑप्शन सुरु केले आहे. मात्र, अद्याप ‘मार्क इमेल अनरिड’ या ऑप्शनवर काम सुरु असल्याचे समजते आहे. सुरुवातीला 2.5 जीबी स्पेस देणार्‍या जीमेलचा दावा होता की, डिलिट बटनाची गरजच पडणार नाही. मात्र, अनेकदा याची स्पेस वाढविण्यात आली मात्र तरीही युजर्सना डिलिट बटनाची गरज भासत असल्याचे जाणवल्याने अखेर हे नवं ऑप्शन सुरु करण्यात आलं.