शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2016 (09:26 IST)

नको असलेले कॉल्स टाळण्यासाठी सोपा उपाय..

तुम्हाला नको असलेले कॉल आणि ङ्कॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका. कारण, आता टेलिकॉम   रेग्युलेटर अँथॉरिटी अर्थात ट्रायनं एक असं मोबाइल अँप लॉन्च केलंय जे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला नको असलेले कॉल्स तुम्ही टाळू शकता. या अँपचं नाव आहे ‘Do Not Call Services’. शिवाय याबद्दल तुम्ही तुमची तक्रारही नोंदवू शकता. इतकंच नाही तर तुमच्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली किंवा नाही हेदेखील तुम्हाला या अँपवरच कळू शकेल. गुगल प्ले स्टोअरवरून हे अँप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करू शकता. सध्या तरी हे अँप केवळ अँन्ड्रॉईड यूजर्स वापरू शकतील. लवकरच ते iosवरही उपलब्ध होईल. आतापर्यंत नको असलेले कॉल्स टाळण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी केवळ 1909 हा क्रमांक उपलब्ध होता.