शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2015 (10:44 IST)

पुढील वर्षी केवळ स्मार्टफोनच

जागतिक अहवालानुसार जगभरात वापरल्या जाणार्‍या मोबाइल फोनपैकी 75 टक्के फोन स्मार्टफोन आहेत. वर्षभरापूर्वी हेच प्रमाण 70 टक्के होते. यंदा जगभरातील स्मार्टफोन धारकांमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. 2016 पर्यंत स्मार्टफोनधारक पूर्णपणे साध्या मोबाइल फोनची जागा घेतील.
 
भारताच्या वाढत्या लोकसंख्येकडे जगभरातील कंपन्या आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ म्हणून पाहात आहेत. या वाढत्या आकडेवारीकडे मोबाइल कंपन्यांचेही चांगलेच लक्ष आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी मोबाइल कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये वाढ होत आहे. एरिक्सन मोबिलिटीने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार मोबाइल ग्राहकांची संख्या वाढण्यात भारत अव्वल क्रमांकावर आहे. जुलै ते सप्टेंबर 2015 या कालावधीत नव्याने एक कोटी तीस लाख ग्राहक कंपन्यांशी जोडले गेले आहेत. याचाच अर्थ दर सेकंदाला एक नवीन ग्राहक कोणत्या ना कोणत्या मोबाइल कंपनीशी जोडला जातो. एका जागतिक अहवालानुसार जगभरात वापरल्या जाणार्‍या मोबाइल फोनपैकी 75 टक्के फोन स्मार्टफोन आहेत. वर्षभरापूर्वी हेच प्रमाण 70 टAके होते. 2016 पर्यंत स्मार्टफोनधारक पूर्णपणे साध्या मोबाइल फोनची जागा घेतील. त्यातील 85 टक्के स्मार्टफोनधारक 2021 च्या अखेरपर्यंत मोबाइल ब्रॉडबँडचा वापर सुरूही करतील, असेही या अहवालात नमूद आहे. जगभरात मोबाइल इंटरनेट वापरणार्‍यांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोबाइल इंटरनेट वापरणार्‍यांच्या संख्येत 63 टक्के वाढ झाली. 2015 ते 2021 या कालावधीत या संख्येत 11 पटींची वाढ होईल.