शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2015 (11:11 IST)

भारतीयांचा दिवसातील 47 टक्के वेळ व्हॉटस् अँपवर

भारतातील स्मार्टफोन वापरणारे एका दिवसातील जवळपास अर्धावेळ मेसेजिंग अँप्लिकेशन्सवर घालवतात, असे एका सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. इरिक्सन या स्वीडिश कंपनीने एक सर्वेक्षण केले, त्यात ही माहिती समोर आली आहे. 
 
या सर्वेक्षण अहवालानुसार भारतीयांचा एक दिवसातील तब्बल 47 टक्के वेळ व्हॉटस् अँप, वुई चॅट, स्काईप, हाईकसारख्या मेसेजिंग अँपवर जातो. इरिक्सनच्या अहवालानुसार, स्मार्टफोन्सवर संवादाची प्रक्रिया सतत सुरूच असते. त्यामुळे कित्येकांच्या स्मार्टफोन्सवर हे अँप्स हे कायम ‘ऑन’ असतात. मोबाइल ब्रॉडबँडचा सर्वाधिक वापर या अँप्सच्या वापरासाठीच केला जातो. भारतीय लोक आपल्या एका दिवसातील वेळेच्या 47% वेळ स्मार्टफोन्सवर व्हॉइस, इन्स्टंट मेसेजिंग, स्काईप, ई-मेल्स किंवा सोशल नेटवर्किग साईट्सच्या वापर करण्यात घालवतात, असे स्पष्टपणे या अहवालात म्हटले आहे. 
 
स्वीडनमधील टेलिकॉम उपकरणे तयार करणारी कंपनी ‘इरिक्सन’कडून या संशोधनात भारत, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन व अमेरिकेतील अँड्रॉइड वापरकत्र्यांचे नमुने वापरण्यात आले होते. भारतात 7 हजार 500 अँड्रॉईड वापरकत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.