शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By वेबदुनिया|

वर्जिन मोबाईलचा नवा कॅमफोन

WD
वर्जिन मोबाईलने आपला नवा 'वीकेईडब्ल्यूएल' हा कॅमेराफोन बाजारात आणला आहे. या हॅण्डसेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या सुविधेबरोबर 1.3 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

याचबरोबरच लाईफटाइम व्हॅलिडिटीचे प्रीपेड कनेक्शन, एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडियोची सुविधाही यामध्ये आहे.

वर्जिनच्या या फोनमध्ये 1.8 इंचाची टीएफटी एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचे रेजील्यूशन 76x220 पिक्सल आहे. तुमच्या मनोरंजनासाठी वीकेईडब्ल्यूएल फोनमध्ये काही गेमही लोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि कनेक्टिविटीसाठी डब्ल्यूएपी(वेप) ची सुविधाही देण्यात आली आहे.