शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2015 (11:59 IST)

स्मार्टफोन अधिक ‘स्मार्ट’ बनवणारे पाच अँप्स

एका फोनला स्मार्ट त्याचे फीचर्स आणि अँप्स बनवतात. जर तुम्ही अँड्रॉइड यूजर असाल तर गुगल प्ले स्टोअरच्या रूपात तुमच्याजवळ अँप्सचा साठा आहे. अँप्सच्या याच साठ्यातील असे पाच चांगले अँप्स आहेत जे तुम्हाला योग्य दिशा देतात.
 
1. नेव्हिगेशन अँप्स हे मार्गदर्शक म्हणून काम करतात. इंटरनेट कनेक्शन नसल्यानं हे अँप्स नीट काम करत नाही. पण जर अशी अडचण आली तर त्यावर उपाय हा ऑफलाईन अँप्समध्येच Offline pps आहे. होय, पाच असे ऑफलाईन नेव्हिगेशन अँप्स आहेत जे इंटरनेटशिवाय तुम्हाला योग्य रस्ता दाखवू शकतात. या आधी हे अँप फक्त नोकिया फोन यूजर्ससाठीच होतं. पण आता हे अँड्रॉइडसाठी उपलब्ध आहे. हे अँप प्रत्येक वेळी तुम्हाला व्हॉईस गाइड देतं. यामध्ये 100 हून अधिक देशांचे नकाशे सेव्ह करून ते भविष्यात ऑफलाईन वापरता येऊ शकतात. 40 पेक्षा अधिक देशांमध्ये हे अँप रिअल टाइम ट्रॅफिकची सुविधा देतं.
 
2. Co-Pilot GPS - Plan explorer
ऑफलाईन नेव्हिगेशन अँपच्या श्रेणीत आणखी एक चांगलं अँप म्हणजे ’Co-Pilot GPS’. या अँपमध्ये रेस्टॉरंट, मल्टिप्लेक्स, कॉफी शॉप यांची माहिती मिळू शकते. ड्रायव्हरच्या सुविधेसाठी 3ऊ गायडन्स डिस्प्ले आहे. रिअल टाइम ट्रॅफिक, ऑटोमॅटिक रुटिंगसारखी सुविधा आहे.
 
3. MPS.ME - offline maps
345 हून अधिक देशांमध्ये ऑफलाईन रुटगाईडच्या रूपातील ‘MPS.ME’ एक चांगलं अँप आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक ठिकाणांचे लँडमार्क, पॉइंट ऑफ इंटरेस्ट, प्रत्येक गल्ली, चौकाचौकाची माहिती देण्यात आली आहे. हे अँप जवळपास दररोज अपडेटही होतं.
 
4. GPS Navigation Maps by Sygic
सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अँपमध्ये याचा समावेश होतो. या अँपमध्ये क्रॉस बॉर्डर रुटिंगची सुविधा आहे. म्हणजेच देशाबाहेर गेल्यावर तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन देशाचं नाव बदलण्याचीही गरज नाही. पॉइंट ऑफ डेस्टिनेशन, फ्री मॅप अपडेट्स, व्हॉईस नेव्हिगेशन यांसारख्या सुविधाही यात आहे.
 
5. MapFactor: GPS Navigation
सर्वात लोकप्रिय नेव्हिगेशन अँप्समध्ये दुसर्‍या क्रमांकाचं अँप आहे ‘MapFactor’. हे अँप क्रॉस बॉर्डर रुटिंगसह तुम्हाला डोअर टू डोअर रुट प्लॅन देतं. यामध्ये 2D आणि 3D मोड आहेत, ज्याचा वापर यूजर त्यांच्या सोयीनुसार करू शकतात. याशिवाय दिवस आणि रात्रीसाठी विविध कलर मोडची सुविधाही यात आहे.