शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2015 (13:46 IST)

‘ब्लॅकबेरी’ला कोण टेकओव्हर करणार?

मोबाइल उत्पादक कंपनी ‘ब्लॅकबेरी’ला टेकओव्हर करण्याच्या बातम्या पुन्हा एकदा टेक मीडियामध्ये येत आहेत. 
 
गेल्या वर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी 2015 मध्ये कंपनी नफ्यात असूनदेखील ही कंपनी विकली जाणार, अशा आशयाच्या बातम्या दिसत आहेत. ‘डिजीटाइम्स’च्या रिपोर्टनुसार, ‘ब्लॅकबेरी’ला टेकओव्हर करणार्‍या कंपन्यांमध्ये काही कंपन्यांची नावे समोर येत आहेत. या यादीत सर्वात वर आहे मायक्रोसॉफ्ट, श्याओमी, लिनोवो, हुवेई अशा अनेक चिनी कंपन्यांचा समावेश आहे. 
 
मायक्रोसॉफ्ट ‘ब्लॅकबेरी’ला खरेदी करण्यास उत्सुक आहे. कारण ‘ब्लॅकबेरी’ सध्या हार्डवेअरऐवजी सॉफ्टवेअरवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे हा व्यवहार मायक्रोसॉफ्टसाठी फायद्याचा ठरू शकतो. 
 
शाओमीसारख्या चिनी कंपन्याही ‘ब्लॅकबेरी’ला खरेदी करण्यास उत्सुक आहेत. मात्र, पेटंट राईटबाबत काही अडचणी उद्भवू शकतात, असा अंदाज आहे.