गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|

ऑलम्पिक सुवर्ण जिंकण्‍याचे सुशीलचे स्‍वप्‍न

ND
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये फ्रीस्टाइल कुस्‍तीत कांस्य पदक जिंकून नवा इतिहास घडविणा-या पैलवान सुशील कुमारने सोमवारी रात्री भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच 2012 च्‍या लंडन ऑलम्पिकमध्‍ये सुवर्णपदक जिंकणे हे आपले लक्ष्‍य असणार असल्‍याचे जाहीर केले आहे.

सुशील इंदिरा गांधी आंतरराष्‍ट्रीय विमान तळावर आपल्‍या अभूतपूर्व स्वागताने खुश होत सांगितले, की मी जिंकलेले पदक हे देशाच्‍या दृष्‍टीने जितके महत्‍वाचे आहे. तितकेच ते माझ्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देणारेही आहे. माझ्या या यशात गुरू सतपाल यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मोलाचे ठरणार आहे.

त्‍याने सांगितले, की माझ्या सामन्‍याची पूर्ण तयारी गुरू सतपाल यांनी केली होती. त्‍यांचे मार्गदर्शन मला खूप मोलाचे ठरले. मी पहिला सामन्‍यात पराभूत झाल्‍यानंतरही त्‍यांनी माझे मनोबल वाढविले.

सुशील कुमारला कुस्‍तीत कांस्‍य