1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|

बिंद्राला केंदाकडून 50 लाखांचे बक्षीस

WD
ऑलम्पिकमध्‍ये देशाला 108 वर्षांतील पहिले वैयक्‍तीक सुवर्णपदक मिळवून देणा-या अभिनव बिंद्राला 50 लाखांचे पारितोषिक देण्‍याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून येत्‍या 29 ऑगस्‍ट रोजी होणा-या अर्जुन पुरस्‍कार वितरण सोहळयात हे पारितोषिक देऊन त्‍याला गौरविले जाणार आहे.

10 मीटर एअर रायफल प्रकारात बिंद्राने बिजींग ऑलम्पिकमधील देशाला एकमेव पदक मिळवून दिले आहे. राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रपती भवनात सन्‍मानित करणार असल्‍याचे क्रिडा मंत्रालयाने जाहीर केले आहे.

जागतिक क्रिडा स्‍पर्धांमध्‍ये उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या क्रिडापटूंच्‍या सन्‍मानासाठी 20 लाखांचा पुरस्‍कार देण्‍याची रित आहे. मात्र बिंद्राच्‍या कामगिरीचा विचार करता ही रक्‍कम वाढविण्‍याची मागणी क्रिडा मंत्री एम.एस.गिल यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांकडे केली होती त्‍यास त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला असून ती 50 लाख करण्‍यात आली आहे.

रजत आणि कांस्‍य पदक विजेत्‍यांना दिल्‍या जाणा-या पुरस्‍काराची रक्‍कम अनुक्रमे 18 व 2 लाख्‍ आता वाढवून 30 आणि 20 लाख करण्‍यात आली आहे.

नवी दिल्‍ली,