1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. ऑस्कर
Written By वेबदुनिया|

ऑस्करसाठी अपेक्षा उंचावल्या

जो पुरस्कार मिळाल्यानंतर ऑस्कर मिळण्याची दाट शक्यता असते त्या नामांकित डीजीए पुरस्काराने 'स्लमडॉग मिलियनेर' ला सन्मानित करण्यात आल्याने हा चित्रपट ऑस्करसाठी प्रमुख दावेदार बनला आहे. चित्रपटातील दिग्दर्शन कौशल्याबद्दल दिग्दर्शक डॅनी बॉयल यांना 'डायरेक्टर्स गिल्डऑफ अमेरिका'अथर्ात डीजीए या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1948 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे वैशिष्ठ म्हणजे यापूर्वी ज्या दिग्दर्शकांना हा पुरस्कार मिळाला, त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळालेला आहे.

'स्लमडॉग'ला हा यावर्षीचा पुरस्कार मिळाला असल्याने ऑस्करसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत. 'नो कंट्री फॉर ओल्ड मेन'या चित्रपटासाठी हाच पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक जोएल व एथेन यांच्याहस्ते बॉयला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.