testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अल्प मुदतीचे रोजगाराभिमुख कोर्स

career
Last Modified गुरूवार, 12 मे 2016 (14:43 IST)
भारत सरकारच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित खादी आणि ग्रामोद्योग आयोग कार्यरत आहे. हे आयोग आणि सी.बी.कोरा ग्रामोद्योग संस्थांच्या वतीने अल्प मुदतीचे रोजगाराभिमुख, व्यवसायाभिमुख कोर्सेसचे आयोजन करण्यात येते.

नुकतीच विविध कोर्सेसची घोषणा करण्यात आली असून हे कोर्स, त्यांचा कालावधी, संपर्क क्रमांक आदी माहिती पुढीलप्रमाणे आहे.

शासनमान्य बॅग मेकींगचा कोर्स दि. 12 मे, 2016 पासून सुरु होत असून त्याचा कालावधी 15 दिवस इतका आहे. गाऊन मेकींगचा कोर्स दि. 14 मे, 2016 पासून सुरु होत असून त्याचा कालावधी 7 दिवस इतका आहे. शिवण कामातील बेसिक टेलरिंग कोर्स दि. 12 मे, 2016 पासून सुरु होत असून त्याचा कालावधी 15 दिवस इतका आहे. प्रत्येक कोर्ससाठी एकूण 30 जागा आहेत. या कोर्सच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया श्रीमती अंजली वारंग यांच्याशी 9969670647/8879103945 या मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधावा.

नव उद्योजक, उद्योजक, गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग अशा प्रत्येकासाठी उद्योजकता पूर्व विकास कार्यक्रमाबाबत 3 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दि. 13 ते 15 मे, 2016 या दरम्यान आहे. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया 022-28982043/ 28694524 या दूरध्वनी क्रमाकांवर अथवा 9820310296/9820655983 या मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधावा.

ब्युटिशिअन कोर्स हा फक्त महिलांसाठी असून तो दि. 12 मे, 2016 पासून सुरु होत आहे. या कोर्समध्ये संपूर्ण प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण साहित्य व छापील नोट्स पुरविल्या जातील. या कोर्सचा कालावधी 25 दिवस इतका आहे. प्रधान मंत्री रोजगार हमी योजना अंतर्गत 25 लाख पर्यंतची कर्ज योजना कशी करावी हेही या कोर्समध्ये सांगितले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी श्रीमती नयना राठोड यांच्याशी 9892822343/7738253884 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

संस्थेचा पत्ता :
सी.बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान,
शिंपोली गाव, गावदेवी मैदानाजवळ,
बोरीवली (प), मुंबई - 92

- देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(प्रशासन)


यावर अधिक वाचा :