testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फार्मसी क्षेत्रात करिअर

farmacy career
Last Updated: सोमवार, 21 एप्रिल 2014 (15:52 IST)
फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त आयटी कंपनी म्हणून ओळख असणार्‍या कंपन्यासुध्दा औषधीनिर्मितीकडे वळत आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होतायत. फार्मसी कोर्स केल्यावर मेडिकल शॉप उघडायचं असं नव्हे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. फार्मसीमध्ये फार्म डी हा नवीन हा कोर्सही येऊ घातला आहे. जगाच्या नकाशात औषधनिर्मित क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वात स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. दुर्धर समजल्या जाणार्‍या विविध औषधांवर देखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे. आरोग्यविषयक सॉफ्टेवेअर विकसित होत आहे. त्यामुळे फार्मसी म्हणजे फक्त औषधाचे दुकान ही ओळख आता नाहीशी होत आहे. परदेशांत डॉक्टर पेशंटला औषधे लिहून देत नाहित.

डॉक्टर आजाराचे निदान करतात आणि फार्मसिस्ट त्यावर औषध देतात. भारतात तशी परिस्थिती नाही. जगात अमेरिका औषधनिर्मितीमध्ये आघाडीवर आहे. इतर देशांमध्ये देखील फार्मसिस्ट आवश्यक असतात. जगात 80 टक्के देशांत भारत औषध पुरवठा करित आहे. भारतात अनेक फार्मसीमध्ये कंपन्या संशोधन करीत आहेत. क्लिनिकल रिसर्च, आयटी कंपनी, क्लिनिकल ट्रायल ही नविन क्षेत्रं खुली होत आहेत. फार्मसीसाठी डिप्लोमा इन फार्मसी आणि बिफार्म करणार्‍यांच्यी संख्या जास्त होती. डीफार्म करुन औषधांचे दुकान आणि बिफार्मनंतर दुकान किंवा नोकरीचाच विचार केला जात होता; परंतु गेल्या काही वर्षात ही परस्थिती बदलली आहे. अशी समजूत होती; परंतु भारताचा बहुतेक राज्यांत औषध कंपन्या आहेत. केमिकल कंपन्यांमध्येसुध्दा फार्मसीचं शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. आधी फार्मसीमध्ये मास्टर्स डिग्री घेण्यार्‍यांची संख्या कमी होती; परंतु आजकाल मास्टर्स करणार्‍यांची संख्या वाढत आहे.


अभ्यासक्र्म :
डी. फार्म - बारावीनंतर डिप्लोमा फार्मसी करता येते. दोन वर्षाचा हो कोर्स असतो. डिप्लोमा फार्मसी हे त्या क्षेत्रातील प्राथमीक शिक्षण असल्याने ज्यांना बारावीत कमी गुण आले आहेत, त्यांनी डिप्लोमाचा विचार करायला काही हरकत नाही. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळतो. मेडिकल रिप्रेझेंटिव्ह आणि फार्मसीचे दुकान या संधी असतात.

बी. फार्म - बारावीनंतर चार वर्षाचा हा कोर्स आहे. या कोर्सनंतर डिप्लोमा फार्मसीच्या विध्यार्थ्याना शिकवता येते. औषधनिर्मिती कंपनीमध्ये नोकरीच्या संधी असतात. कंपनीमध्ये विविध शाखांमध्ये काम करता येते.


एम. फार्म - फार्मसी क्षेत्रातील मास्टर्स डिग्री असल्याने संशोधान विभागामध्ये काम करता येते. डिप्लोमा आणि डिग्रीच्या विध्यार्थ्यांना शिकवता येते.


फार्म डी - वरिल कोर्सच्या व्यतिरिक्त हा नवीन कोर्स येत आहे. फार्म डी नावाचा हा कोर्स असून, डॉकटर ऑफ फार्मसी असा याचा अर्थ आहे. सहा वर्षांचा हा कोर्स असून, प्रथम अमेरिकेत हा कोर्स सुरु झाला. डॉक्टरसोबत या विध्यार्थ्यांना काम करावे लागत असल्याने हे विध्यार्थी डॉक्टरला औषध लिहून देण्यात मदद करु शकतात. फार्मसी आणि मेडिकल असे सर्व शिक्षण या विध्यार्थ्यांना घेता येते. त्यामुळे हे विध्यार्थी फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील दुवा असतो.

संधी - संशोधन, सरकारी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय, हॉस्पिटल मॅनेजमेंट.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...

फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

national news
व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...