सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (13:49 IST)

'स्टार्टअप' ला यशस्वी करण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स

काम करणे म्हणजे फक्त शारीरिक सुख मिळवून घेणेच नाही, तर शरीराने, मनाने प्रयत्न करून सर्व सुख मिळवायचे असते. तसेच आपल्याला आपल्या विचारांमध्ये पूर्णता असावी.
 
 कोणतेही व्यवसाय आरंभ करणे हे देखील कामाचेच स्वरूप आहे. खरं तर आजच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असत की त्यांनी एक व्यवसायी बनावे. त्याचे स्वतःचे एक ऑफिस असावे आणि त्यांनी प्रगती करावे. प्रत्येकाला असे वाटते की ते स्टार्टअप करून यशस्वी बनावे. पण बरेच कमी लोक असे असतात की या क्षेत्रात यशस्वी होतात आणि या शर्यतीत जिंकतात. हे देखील एक कटू सत्य आहेत. 
 
प्रश्न असा उद्भवतो की एका यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये कोणते गुण भिन्न असतात. चला तर मग जाणून घेऊ या की या काळात स्टार्टअप मध्ये कोणते गुण आपल्याला यशस्वी बनविण्यात मदत करतात.
 
* नवीन प्रयोग आवश्यक आहेत 
आपण नवीन व्यवसाय नुकतेच सुरू करत आहात, म्हणून या साठी नवे - नवे प्रयोग करायला कसलेच संकोच करू नका. बऱ्याच वेळा असे घडते की एखाद्या व्यक्ती कडे काही कल्पना असतात आणि तो त्या कल्पनेलाच धरून बसतो. ती कल्पना चांगली किंवा वाईट असू शकते. पण काळानुसार स्वतःला बदलणे आणि आपल्या कल्पनेला बदलणे किंवा सुधारणे देखील आवश्यक आहे. एखाद्या सॉफ्टवेयर ला अपडेट करण्या प्रमाणे.
 
 नक्कीच आपल्याला नवे प्रयोग केले पाहिजे. यशस्वी होण्यासाठी कामाच्या नव्या पद्धती शिकणे गरजेचे आहे. या साठी आपण कोणतीही कोताही करू नये. या मुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता वाढते. 
 
तथापि आपले लक्ष एकच असावे, आणि आपल्याला त्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी चांगले मार्ग शोधायला पाहिजे. कोणतेही प्रयोग सुरुवातीस पूर्ण नसतात पण सतत प्रयत्न करून आणि त्यामध्ये सुधारणा करून ते परिपूर्ण होतात. 
 
म्हणजे या साठी आपल्याला नव्या गोष्टी शिकायला पाहिजे. या साठी आपण एखादा नवीन कोर्स देखील करू शकता, काही नवीन लोकांकडून सल्ले देखील घेऊ शकता. हे सर्व आपण करावे या मुळे आपल्याला नवी प्रेरणा मिळेल जी आपल्याला सतत यशाच्या मार्गाकडे वाढण्यासाठी प्रेरित करेल. 
 
आपण स्वतः देखील सर्जनशील व्हावे आणि आपल्या कार्यसंघाला किंवा टीम ला देखील सर्जनशील बनवावे. स्टार्टअप मध्ये कोणते ही व्यक्ती एकटे नसून त्याच्या सह बरेच सहकारी असतात, तसेच ग्राहक देखील त्यांच्या सह जोडलेले असतात. त्यांच्याशी मोकळे होता आलं पाहिजे. या साठी आपण असे वातावरण निर्माण करावे जी आपल्याशी जोडलेल्या प्रत्येकाला आरामदायक वाटले पाहिजे. नेहमी सर्वांना महत्त्व द्यावे. असं केल्यानं आपल्याला पुढे वाढण्यात मदत देखील मिळेल.
 
* कामाचे तास वाढविण्यात संकोच बाळगू नका - 
या विषयाबद्दल प्रत्येकाचे वेग वेगळे मत असू शकतात. पण कधी एखादी वेळ अशी असते की सर्वांचे मत एक होतात. कोणत्याही स्टार्टअप मध्ये असे बरेचशे कार्य केले जातात या मध्ये बरेच प्रयोग अशी असतात जी अयशस्वी होतात. या साठी आपल्याला त्या कार्यांना यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक वेळ द्यावे.
 
तर मग स्टार्टअप ला एखाद्या नित्यक्रम म्हणून घेण्याऐवजी अधिकाधिक वेळ द्यावे. आपल्या सहयोगिनां देखील कामाला यशस्वी करण्यासाठी अधिक वेळ देण्यासाठी प्रेरित करावं. जेणे करून स्टार्टअप च्या आवश्यकतांना पूर्ण करता येईल आणि योग्य दिशेला वाढता येईल. वेळ दिल्यानं आपल्या सर्व समस्या दूर होतील. या बद्दल काहीही दोन मते नाहीत.
 
* दबाव घेणं टाळावे -
 स्टार्टअप मध्ये याची सर्वात जास्त आवश्यकता असते. बऱ्याच वेळा असे होते की आपल्याला काही समजत नाही पण आपण त्यासाठी आपला वेळ आणि डोकं लावत असतो.
 
बऱ्याच वेळा वरच्या पक्षाकडून आपल्यावर दबाव आलेले असते आणि आपण त्या परिस्थितीला सहज घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला नैराश्य येत आणि आपले स्टार्टअप नैराश्याने ग्रासले जाऊ शकतं. म्हणून दबावाच्या खाली असून देखील आपल्याला आपल्या कामाला कौशल्यानं करण्यामध्ये सतत सुधारणा करायला हवी. कधीही हार मानू नका. हीच एकमेव अशी गोष्ट आहे जी नेहमीच मार्ग मोकळे करण्यास सक्षम असते. 
 
* कामावर नेहमी प्रेम करावे - 
ही फार महत्त्वाची बाब आहे जर आपण कामावर प्रेम केले नाही तर ते आपल्यासाठी  कंटाळवाणी आणि ओझं वाटू लागत. दुसरी कडे जर आपण कामावर प्रेम केलं आणि त्याला एका मुलाप्रमाणे जपलं तर नक्कीच हे आपल्यासाठी यशाचे मार्ग उघडतात.
 
लक्षात घ्या की आपण या स्टार्टअपचे मालक आहात! जर का आपण याला एखाद्या मुलासारखे जपले तर आपल्याला आपल्या स्टार्टअप ऑफिसात स्वच्छता करायला देखील काहीच कमीपणा वाटणार नाही आणि या साठी मोठ्या मीटिंग घेण्यास देखील कौशल्य दाखवू शकता. जी एखाद्या स्टार्टअप साठी आवश्यक असते. 
या पात्रतेव्यतिरिक्त शिस्तबद्धता देखील तितकेच आवश्यक आहे. लक्षात ठेवा की शिस्तबद्धता म्हणजे एखाद्या वर हुकूम गाजवणे नसून स्वतःला शिस्त लावणं आहे. जर आपण स्वतः ला शिस्त लावाल तर विश्वास ठेवा की आपली सम्पूर्ण टीम किंवा कार्यसंघ देखील याचा मनापासून स्वीकार करेल. अशा परिस्थितीत वेळेचे व्यवस्थापन आपल्यासाठी बरेच सोपे होईल. आपण शिस्तबद्धता ने वागत असाल तर आपल्याला ऑफिसच्या लोकांसहची ट्यूनिंग चांगली दिसून येईल जी आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.