गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:20 IST)

या सवयी सोडा, व्यक्तिमत्त्वाला आकार द्या

बऱ्याच वेळा आपण कळत - नकळत अशा सवयी लावून घेतो, जी नंतर आपल्याला यशापासून दूर करते. अशा परिस्थितीत, जीवनात यश मिळविण्यासाठी काही गोष्टींना टाळावे, नाही तर याचा परिणाम केवळ आपल्या व्यक्तित्वावरच पडणार नसून आपल्या यशावर देखील पडतो. त्या मुळे आपल्याला यश मिळत नाही. चला तर मग त्या नकारात्मक गोष्टीबद्दल जाणून घेऊ या.
 
 * आपल्या योग्यतेवर संशय घेऊ नका - 
बऱ्याच वेळा असे घडते की जेव्हा कोणी काही नकारात्मक बोलल्यावर आपण संशयाने वेढलेले असतो पण या परिस्थितीत आपण दुसऱ्यांच्या सांगण्यात न येता स्वतःवर अविश्वास करू नका. आपल्यापेक्षा कुणीही आपल्याला ओळखू शकत नाही. म्हणून आपल्या मनाला कुठे ही न भटकवता आपल्या क्षमतेनुसार काम करा.
 
* कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करू नका -
आपल्या आयुष्यात काहीही चांगले घडले असेल किंवा वाईट. त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करू नका. हे करणे योग्य नाही. असं केल्यानं आपले मन भटकतच राहील आणि आपण आपल्या ध्येयापासून लांब होणार.
 
* अति भावनिक होणं टाळा -
माणसांमध्ये भावना असणे वाईट नाही, पण त्या भावनांवर नियंत्रण न ठेवणे आपल्यासाठी  घातक ठरू शकत. अत्यंत आनंद किंवा अति दुःख हे दोन्ही विचार करण्याच्या शक्तीला कमकुवत करतात. म्हणून अति भावनिक होणं टाळावे.
 
* चुका करू नये -
आयुष्यात प्रत्येका कडून चुका होतात, म्हणून आपण ज्या चुका केलेल्या आहेत. त्यांना बघून पुढे वाढा आणि उद्यावर लक्ष द्या. केलेल्या चुकांसाठी नेहमी रडल्यानं नवीन मार्ग सापडणार नाही.