बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. प्रयाग कुंभमेळा 2019
Written By

प्रयाग कुंभ मेळा 2019: प्रयागराज कसे पोहोचायचे?

प्रयागराज (अलाहाबाद) येथे 15 जानेवारी 2019 पासून सुरू होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात पोहचण्यासाठी देशातील सर्व शहरातून रेल्वे, बस आणि एअर सुविधा उपलब्ध आहेत. प्रयागराज महत्त्वपूर्ण धार्मिक आणि प्राशासनिक स्थळ असल्यामुळे वायू, रेल आणि सडक मार्गाद्वारे भारताच्या सर्व प्रमुख शहरांपासून जुळलेले आहेत. जाणून घ्या या बद्दल संक्षिप्त माहिती...
 
सडक मार्ग : प्रयागराज शहर भारताच्या राष्ट्रीय आणि राज्य राजमार्गाद्वारे देशातील सर्व बाजूंनी जुळलेलं आहे. आपण राजस्थान, दिल्ली, जम्मू-काश्मीर, मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब आणि हरयाणा राज्यांच्या राजधानीहून सरळ प्रयागराज पोहचू शकता. पर्यटक आणि तीर्थ प्रवाशांसाठी प्रयागराज येथे तीन बस स्थानक आहेत. येथून आंतरराज्यीय बस सेवेने देशातील विभिन्न मार्गांपर्यंत पोहचता येऊ शकतं.
 
रेल्वे मार्ग : प्रयागराज उत्तर-मध्य रेल्वे जोन मुख्यालय आहे. अलाहाबाद येथे 10 रेल्वे स्टेशन आहेत. हे भारताच्या प्रमुख शहर जसे दिल्ली, मुंबई, बेंगलुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, इंदोर, भोपाळ, ग्वालियर, जयपूर, लखनऊ, वाराणसी, कानपूर, पुणे, रायपूर, डेहराडून, भुवनेश्वर इतरांशी जुळलेले आहेत.
 
1.अलाहाबाद छिवकी (ए.सी.ओ.आय.)
2.नैनी जंक्शन (एन.वाय.एन.)
3.अलाहाबाद जंक्शन (ए.एल.डी.)
4.फाफामऊ जंक्शन (पी.एफ.एम.)
5.सूबेदारगंज (एस.एफ.जी.)
6.अलाहाबाद सिटी (ए.एल.वाय.)
7.दारागंज (डी.आर.जी.जे.)
8.झूसी (जे.आई.)
9.प्रयाग घाट (पी.वाय.जी.)
10.प्रयाग जंक्शन (पी.आर.जी.)
 
सर्व गंतव्य स्थळांपासून रेल्वे मार्ग सुलभ आहे. या संबंधी बुकिंग आय.आर.सी.टी.सी. बेवसाइट irctc.co.in व रेलकुम्भ अॅप (विशेष रेल) द्वारे करता येऊ शकते.
 
वायू मार्ग : प्रयागराजहून 12 किलोमीटर अंतरावर अलाहाबाद डोमेस्टिक विमानतळ आहे ज्याला बमरौली एअर फोर्स बेस देखील म्हटलं जातं. या व्यतिरिक्त अलाहाबादच्या जवळ इतर दोन विमानतळ आहेत- प्रयागराजहून सुमारे 130 किलोमीटर लांब वाराणसी येथे लाल बहादुर शास्त्री विमानतळ आणि प्रयागराजहून सुमारे 200 किलोमीटर लांब उत्तरप्रदेशच्या राजधानी लखनौ येथे अमौसी आंतरराष्ट्रीय विमानतळ. कानपूर विमानतळाहून 200 किलोमीटर लांब आहे.
 
पोहचल्यावर : कुंभ मेळ्यात पोहचण्यासाठी बस स्टॉप, स्टेशन, एअरपोर्टहून आपल्याला स्थानिक गाड्या, ऑटो रिक्शा, सिटी बस आणि आंतरराज्यीय बस मिळतील.
 
आवास सुविधा : प्रयागराजमध्ये तीर्थ प्रवाशांना राहण्यासाठी विभिन्न सुविधा उपलब्ध आहे- ज्यात डीलक्स हॉटेल, बजेट हॉटेल, विरासत हॉटेल, गेस्टहाउस, धर्मशाला आणि शिबिर. 
आपण ऑनलाईन बुकिंग देखील टाकू शकता.